सांगली जिल्ह्यात शुक्रवारी ड्राय डे!
सांगली : खरा पंचनामा
संपूर्ण देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शुक्रवारी दिवसभर ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस विभागाने जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने, बिअर बार, ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयास कळवले होते.
पोलिस विभागाच्या त्या पत्रानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गुरुवारी रात्री 12 वाजलेपासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्व प्रकारची दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. या निर्णयाचे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.