दिराने वहिनीसह तिच्या दोन मुलांचा केला खून : अनैतिक संबंधातून कृत्याचा संशय
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर तिहेरी हत्याकांडानं हादरलं आहे. हे हत्याकांड एकाच कुटुंबातील आहे. सख्ख्या दिरानेच त्याची वहीनी आणि तिच्या दोन मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळून टाकले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. संशयिताने त्याची २५ वर्षीय वहिनी अन् तिच्या ४ आणि ६ वर्षीय मुलांचा खून केल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० वर्षीय संशयिताचे तिच्या वहिनीशी अनैतिक संबंध होते. मात्र त्याला तिच्या वहिनीचे आणखी कोणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात त्याने वहिनीला आणि तिच्या सहा अन् चार वर्षांच्या मुलीस संपवले. त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून जाळले.
संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.