मराठा समाजातील वंचित घटकांसाठी धोरणात्मक निर्णयाची गरज : पाटील
सांगली : खरा पंचनामा
मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना कर्जावरील व्याज परतावा दिला जातो. या योजनेचा अनेकांना लाभ मिळाला असला, तरी समाजातील विविध घटक या लाभापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहत असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
महामंडळाचे अध्यक्ष पाटील आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीच्या शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली. महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी सर्व प्रश्नांवर कार्यवाही सुरू असून लवकरच ते सोडवले जातील, असे आश्वस्त केले. जिल्हा बँकांनी मराठा तरुण उद्योजक बनावेत, यासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील, शिवसेनेचे नेते शंभूराज काटकर, सतीश साखळकर, विश्वजित पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, योगेश पाटील, श्रीरंग पाटील, शरद नलावडे, धनंजय वाघ, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.