जोधपूर-बंगळुरू एक्सप्रेसचे सांगलीत जल्लोषात स्वागत
सांगली : खरा पंचनामा
रेल्वे गाडी नं १६५३३ जोधपूर-बंगळुरू एक्सप्रेस व गाडी नं १६५३४ बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. यातील पहिली बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्टेशन वर आज सोमवारी दुपारी १ वाजता थांबली. या गाडीचे नागरिक जागृती मंचतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ही गाडी बंगळुरू सिटी येथून रविवारी संध्याकाळी ५ वाजता सुटून यशवंतपूर, हिंदुपूर, धर्मावरम, अनंतपुर, गुंतकल, बेल्लारी, होस्पेट, कोपल, गदग, हुबळी, धारवाड, मिरज येथे थांबून सोमवारी दुपारी १ वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे थांबली. सांगली रेल्वे स्टेशनवरून निघून ही गाडी सातारा, पुणे, मुंबई (कल्याण), मुंबई (वसई रोड), वलसाड, सुरत, आनंद, वडोदरा, अहमदाबाद, आबू रोड, मारवाड, पाली-मारवाड, भगत की कोठी येथे थांबून जोधपुर ला मंगळवारी दुपारी २:३० वा पोचेल.
परतीच्या प्रवासात जोधपुर-बंगळुरू एक्सप्रेस जोधपुर हून बुधवारी सकाळी सहा वाजता निघून भगत की कोटी, पाली-मारवाड, मारवाड, आबू रोड, अहमदाबाद, आनंद, बडोदा, सुरत, वलसाड, मुंबई( वसई रोड), मुंबई (कल्याण), पुणे, सातारा येथे थांबून गुरुवारी सकाळी ७ वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबेल.
सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून ही गाडी पुढे मिरज, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, गदग, कोपल, होस्पेट, बेल्लारी, गुंतकल, अनंतपुर, धर्मावरम, हिंदुपूर, यशवंतपूर येथे थांबून शुक्रवारी पहाटे २:३० वाजता बंगळुरू सिटी येथे पोहोचेल.
या गाडीमुळे सांगली जिल्हा राजस्थान गुजरात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांशी जोडला गेला आहे. नागरिक जागृती मंच ने सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त लोकांनी सांगली रेल्वे स्टेशन वरून या रेल्वे गाडीचे तिकीट बुक करावे व आधी इतर स्टेशनवरून बुक केलेल्या तिकिटांचे बोर्डिंग स्टेशन सांगली असे लवकरात लवकर बदलून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या गाडीचे स्वागत करण्यासाठी कॉ. उमेश देशमुख, विजय शहा, सतिश साखळकर, शरद शहा, व्यंगचित्रकार रोहीत कबाडे, रोहीत गोडबोले, नगरसेवक प्रकाश मुळके, बापूसाहेब माने, जितेद्र कुंभार, बीरू आस्की, अभिजीत कोल्हापुरे, अनिल कवठेकर, जगन्नाथ वाघमाडे, तानाजी सलगर, प्रशांत भोसले, सुरेश साखळकर आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.