मजरेवाडीत तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. मजरेवडीतील बीपीएड कॉलेज लगतच्या शेतात ही घटना घडली. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तरुणाच्या खुनाचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.
सावकार कलाप्पा देबाजे (वय 35) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने त्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावकर देबाजे सोमवारी दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा काल रात्रीपासून नातेवाईक शोध घेत होते. त्याचा मेव्हणा माणिक पुजारी याला त्याची मोटर सायकल (एमएच 09 बिडी 5251) बीपीएड कॉलेजच्या रस्त्यावर दिसली. त्याने तेथे शोध घेतल्यावर लगतच्या शेतातील काटेरी झुडपात त्याचा मृतदेह दिसून आला.
अनोखळी व्यक्तीने त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. गुजरेवाडी व कुरुंदवाड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.