उदयनराजे स्वाभिमानीच्या पाठीशी; उलट्या-सुलट्या गोष्टी बाहेर काढू : राजू शेट्टी
सातारा : खरा पंचनामा
सातारा बाजार समिती निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकरी, व्यापारी, हमाल, दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढू. उदयनराजेंशी माझे मैत्रीचे संबंध असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आमची बाजू घेतात. त्यामुळे स्वाभिमानीच्या पॅनेलच्या पाठीशी उदयनराजेंची ताकत राहिल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले, बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकरी, व्यापारी, हमाल, दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल निवडून आल्यानंतर बाजार समितीत उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढून शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक दिली जाईल. ही निवडणूक लढवत असताना आमच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रास दिला गेला पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्यास धमक्यांना भीक घातली नाही.
बोगस दाखल्याबाबत राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बोगस दाखला दिला जातो. तुमच्या जिल्ह्यात दोन दिवसांसाठी दाखले देण्याची नवीन पध्दत आली आहे का. असे होत असेल तर त्याचे दरही आम्हाला सांगा. असले प्रकार सुरु असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. याविरोधात आवाज उठवू, असेही शेट्टी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.