Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार!

अजित पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार!



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार आहेत. हा दावा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटमधून एक प्रकारे भाजपचा पुढचा प्लॅनच सांगितला आहे. दमानिया यांच्या या ट्विटने खळबळ उडाली आहे.


दमानिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. 

अजित पवार गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळीही अंजली दमानिया यांनी फडणवीस आणि अजितदादांच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर, किळसवाणी राजकारण. मी पुन्हा येईन, अशी सूचक कमेंट केली होती.

आतापर्यंत अनेक पत्रकारांशी मी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांच्या सॉफ्ट स्टँडबाबत चर्चा व्हायची. आज जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं कव्हरपेज पाहिलं तर त्यात ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार यांचं नाव वगळलं आहे. अशा बातम्यांमधून संकेत मिळत असतात. मी आठ ते 10 पत्रकारांशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते भाजपला सॉफ्ट आहेत. ते विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक नाही. ते भाजपला पुरक भूमिका घेतात. असंही सांगितलं जातंय की 23 जणांच्या सह्या झाल्या आहेत. याला काय म्हणायचं? या सर्व संकेतामुळे मी ट्विट केलं, असं दमानिया यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.