मारहाणीची तक्रार करणाऱ्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा!
ठाणे : खरा पंचनामा
उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये ठाण्यात जोरदार राडा झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे रुग्णालयात पोहोचले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस 'फडतूस गृहमंत्री' असल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकारी बाळा गवस यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संध्याकाळी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. यात नरेश म्हस्के, माजी उपमहापौर मिनाक्षी शिंदे हे देखील होते. त्यांनी ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि रोशनी शिंदे विरोधात तक्रार केली.
तक्रार दाखल केल्यानंतर नरेश म्हस्के म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटल आणि संपदा हॉस्पिटलने दिलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत आहे की तिला मारहाण झालेली नाही आणि ती गर्भवती नाही. त्यांनी पोलिसांवर देखील चुकीचे आरोप केलेत अपशब्द वापरलेत. खासदार राजन विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनाव करुन त्या महिलेला जबाब द्यायला सांगितले. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तालयातून जाणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे बोलले होते म्हणून त्यांना जेवणाच्या ताटावरुन ताब्यात घेवून अटक केली होती. मग त्यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे. उद्या जर आमच्या कार्यकर्त्यांचा बांध तुटला तर त्याला जबाबदार ठाकरे गट असेल असा इशारा म्हस्के दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.