सरकारी वकिलांची प्रतिमा उंचावणार : जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे
सांगली : खरा पंचनामा
न्यायालयीन कामकाजादरम्यान सरकारी वकिलांची प्रतिमा उंचावणार असल्याचे वक्तव्य नूतन जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. पदभार स्वीकारल्यानंतर भोकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.
नुकतीच सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने सहायक सरकारी अभियोक्ता प्रमोद भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रमोद भोकरे यांनी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांच्या कडून पदभार स्वीकारला.
यावेळी भोकरे म्हणाले, शिक्षेचे प्रमाण वाढावे आणि सरकारी वकिलांची प्रतिमा उंचावण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहणार आहे. समाजाच्या व न्यायविभागाच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करणार आहे. प्रमोद भोकरे हे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून गेली ८ वर्षे काम पाहात आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीना शिक्षा ठोठावण्यात त्यांचे युक्तिवाद महत्वाचे ठरले आहेत. त्यांच्या निवडी बद्दल सांगली वकील संघटना, वकील वर्ग, विविध सामाजिक कार्यकर्ते आदी विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.