मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना भरधाव कारने चिरडले
हातकणंगले : खरा पंचनामा
हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना भरधाव कारने चिरडले. बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालन बाळू वडर (वय ७० रा. कुळरप ता. वाळवा), दिलीप विठ्ठल पाटील (५८ रा. भादोले) अशी मृतांची नावे आहेत. भादोले नजीक मसोबा फाटा जवळ हा अपघात झाला. वडगाव- भादोले रस्त्यावर मसोबावाडी फाट्या नजिक अज्ञात चार चाकी वाहन चालक आष्टाकडे निघाला होता. तर वडगाव कडून फिरून परत भादोले गावाकडे दोघेजण येत होते.
यावेळी कार चालकाने प्रथम वडर यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. तर काही अंतरावरच पुढे दिलीप पाटील यांना याच कारने धडक दिली. यावेळी पाटील यांच्या छातीवरून कारचे चाक गेल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
शालन वडर या माहेरी यात्रेसाठी आल्या होत्या. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. तर दिलीप पाटील साखर कारखान्यात नोकरीस होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी भादोले येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या अपघातानंतर भादोले गावावर शोककळा पसरली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.