कराड-तासगाव मार्गावर अपघातात सांगली जिल्ह्यातील तरुण ठार
कराड : खरा पंचनामा
कराड- तासगाव मार्गावर वडगाव हवेली येथे डिझेल संपलेल्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील एक तरुण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कराड - तासगाव मार्गावर वडगाव हवेली इथे महात्मा गांधी विद्यालयासमोर डिझेल संपल्यामुळे उभ्या असलेला ट्रॅक्टर ट्रेलरला (MH 11 BA 1194 ) ला पाठीमागून स्प्लेंडर दुचाकीने (MH-50-3764) धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक रोहिदास उर्फ किरण माणिक गोडसे (वय 31, रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली) जागीच ठार झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला सदानंद आप्पासो शिंगाडे (वय 25, रा. शेरे, ता. कराड) गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.