Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नगररचनाकडे दहा वर्षांपासून प्रलंबित फायलींचा तातडीने अहवाल द्या सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांचे आदेश

नगररचनाकडे दहा वर्षांपासून प्रलंबित फायलींचा तातडीने अहवाल द्या
सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांचे आदेश



सांगली : खरा पंचनामा

सोमवारी सांगली महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनावेळी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकण्यात आला. या घटनेनंतर महापालिका प्रशासन तातडीने जागे झाले आहे. दरम्यान आयुक्त सुनील पवार यांनी नगररचना विभागाकडे दहा वर्षे तसेच त्याहून अधिक काळ प्रलंबित फायलींचा बुधवारी सकाळी साडेदहापयर्त अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून नगररचना विभागात धावपळ सुरू आहे. 

महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगररचना विभागाकडे ११ वषार्पासून फाईल प्रलंबित असल्याबाबत कैलास काळे यांनी विचारणा केली. त्यावेळी काम मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त पवार यांनी दिले. मात्र काळे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. 

या घटनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार काळे यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या नागरिकांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत. नगररचना विभागाकडे दहा वर्षे तसेच त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सर्व फाईलींचा अहवाल बुधवारी सकाळी साडेअकरापर्यंत मागवला आहे. त्याकाळी नगररचना विभागात काम करत असलेल्या अभियंत्यांनाही हे अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नगररचना विभागाकडे प्रलंबित असलेल्या फाईलींचा युद्धपातळीवर निपटारा होईल अशी चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.