सांगलीत वंदेमातरम् शिवोत्सवाचा थाटामाटात प्रारंभ; शिवप्रताप भूमी मुक्ती लढा छायाचित्राचे प्रदर्शन
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील राजवाडा चौक येथे वंदेमातरम शिवोत्सव थाटामाटात सुरू झाला. या उत्सवाचा समारोह समारोप बुधवारी शिवगर्जना रॅलीने होणार आहे. शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या २१ वर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
वंदेमातरम् शिवोत्सवाचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ व माजी आमदार दिनकर पाटील यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या यशस्वी लढ्याचे छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा नेते मकरंद देशपांडे, उद्योगपती मनोहर सारडा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, भाजपा नेत्या नीताताई केळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास चौथाई, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे पाटील, उर्मिलाताई बेलवलकर, नितीन चौगुले, बाळासाहेब मोहिते पाटील, अविनाश मोहिते, स्वप्निल शहा, सिद्धार्थ गाडगीळ, श्रीकांत शिंदे, प्रसाद रिसवडे, हिंदू एकताचे संजय जाधव, प्रकाश चव्हाण, आनंदराव चव्हाण, दत्ता चव्हाण, रावसाहेब खोजगे, गजानन मोरे, शिवाजी पाटील, चेतन भोसले, माधुरी वसगडेकर, सुष्मिता कुलकर्णी, हेमलता मोरे उपस्थित होते.
प्रतापगड येथे शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या २१ वर्षाच्या लढायाचे छायाचित्राचे प्रदर्शन आमदार सुधीर गाडगीळ व मान्यवरांनी पाहिले व या लढ्याचे व छायाचित्र प्रदर्शनाचे उपस्थित यांनी कौतुक केले हे प्रदर्शन दिनांक २६ एप्रिल पर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. मराठा साम्राज्याच्या काळातील ३०० ऐतिहासिक वीरांच्या समाधी स्थळाचे संशोधन तसेच प्रतापगड जिर्णोद्धार कार्यासाठी अभियंता प्रवीण भोसले यांना श्री. शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
या वंदेमातरम् शिवोत्सवाचे आयोजन माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी केले आहे. या शिवोत्सवासाठी गजानन मोरे, चेतन भोसले, ओंकार पवार, आशिष साळुंखे, निखिल सावंत, असलम शेख, सुमित शिंगे, पंकज कुबडे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.