Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. बाबासाहेबांच्या जयसिंगपूर येथील पुतळ्यासाठी उन्हात पदयात्रा नको : जितेंद्र आव्हाड यांचे ट्विटरवर आवाहन

डॉ. बाबासाहेबांच्या जयसिंगपूर येथील पुतळ्यासाठी उन्हात पदयात्रा नको : जितेंद्र आव्हाड यांचे ट्विटरवर आवाहन



मुंबई : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बसस्थानक चौकातील न्यायालयाच्या जागेत पुतळा उभारण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक आहेत. तर माजी मंत्री, शिरोळचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील बसस्थानक परिसरातील जागेत  हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहेत.  न्यायालयाच्या जागेत हा पुतळा उभारण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी भर उन्हात जयसिंगपूर ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यकर्त्यांना उन्हात पदयात्रा काढू नये आवाहन ट्विटरद्वारे केले आहे.

आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जयसिंगपूर ही करविर नगरीमधील सर्वात मोठी बाजारपेठ त्याचे संपूर्ण नियोजन हे छत्रपती शाहू महाराजांनी केले होते. छत्रपती शाहू महाराजांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातेसंबंध ह्याचे वर्णन इतक्या मोजक्या शब्दांत करणे शक्य नाही. पण, किंबहुना ते अवर्णनीय आहे. दोघेही इतके समजदार होते. जो काही सामाजिक बदल आज महाराष्ट्रात दिसत आहे तो त्यांच्या विचारधारांमुळेच.

जयसिंगपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असावा अशी तेथिल सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. संबंधीत नगरपालिका प्रशासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव देखिल दिला आहे. पण, एस.टी. स्टँडच्या शेजारी असलेल्या मुतारीच्या जागेवर तो उभारा असा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे आणि नागरिकांनी तो अमान्य केला आहे. नागरिकांनी सूचविलेली जागा ही स्वच्छ उघड्यावर तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोपी आहे. असे सर्वसामान्यांचे मत आहे. तरिही नगरपालिका ऐकायला तयार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायचा नसेल तर नका उभा करु. पण, मुतारीच्या जागेवर बाबासाहेबांचा पुतळा आम्ही उभा करु देणार नाही असं तेथिल नागरिकांचे मतं आहे आणि त्यांचे मी खुलं समर्थन करीत आहे. त्यासाठी तेथिल एक नागरिक मोबीन मुल्ला ह्यांनी ह्या उन्हाळ्यात जयसिंगपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे. मी त्यांना विनंती करीन की, एवढ्या उन्हामध्ये ही पदयात्रा निष्कारण आपला जीव घेऊन जाईल. काल घडलेल्या घटनेचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच. आपला हट्ट हा न्याय्य आहे. न्यायाची लढाई आपण सगळे मिळून लढू. पण, तुर्तास ह्या उन्हामध्ये काय होऊ शकते याची कल्पना सगळ्यांनाच आहे. तेव्हा पदयात्रा काढत आपण पायी चालत मुंबईला येण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा अशी विनम्र विनंती मी करीत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.