Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत चोरट्याला अटक, ३.६३ लाखांचे दागिने जप्त : एलसीबीची कारवाई

सांगलीत चोरट्याला अटक, ३.६३ लाखांचे दागिने जप्त : एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरात काँग्रेस भवन परिसरात गाडीला अडकवलेली दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ लाख ६३ हजारांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

सचिन मोहन तरसे (वय ३१, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, बुधगाव) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी एक खास पथक तयार केले होते. तरसे हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. फेब्रुवारीमध्ये तो कामासाठी सांगलीत आला होता. त्यावेळी काँग्रेस भवन शेजारी असलेल्या शासकीय निवासस्थानाबाहेर थांबला होता. त्यावेळी एकजण इमारतीमधून काळी बॅग घेऊन बाहेर आला. त्याने गाडीला बॅग अडकवली. त्यानंतर त्या व्यक्तीला फोन आल्याने बॅग गाडीलाच ठेवून तो इमारतीमध्ये गेला. त्यावेळी ती बॅग लंपास केल्याची कबुली तरसे याने दिली. बॅगेतील रोकड त्याने खचर् केली असून मोबाईल विकल्याचीही कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याच्याकडील ३ लाख ६३ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सचिन धोत्रे, चेतन महाजन, प्रशांत माळी, स्नेहल शिंदे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.