मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत एक पोलिस ठार, एक गंभीर
टेंभुर्णी : खरा पंचनामा
मद्यधुंद दुचाकीस्वाराने पोलिसांच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत एक पोलिस कर्मचारी ठार झाला तर एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नितीन उत्तमराव मतकर (28) आणि कदीम जालना पोलीस ठाण्यातील शिपाई राहुल जंगले (25) हे दोघे मोटरसायकलने टेंभुर्णीहून जाफराबादकडे जात होते.
जाफराबाद ते टेंभुर्णी रोडवरील गोधनखेडा फाट्याजवळ त्यांच्या मोटरसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोलीस शिपाई नितीन मतकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले पोलीस शिपाई राहुल जंगले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने टेंभुर्णी पोलिसांनी जालना येथे उपचारासाठी नेले आहे.
पोलिसांच्या मोटरसायकलला धडक देणाऱ्या मोटरसायकलवरील दोघेही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. पोलीस कॉन्स्टेबल नितीन मतकर यांचा मृतदेह टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.