राजू शेट्टी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!
कोल्हापूर : खरा पंचनामा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे समजते. राजू शेट्टी काँग्रेस नेते अशोक चव्हाण भेटीला जाणार आहेत. नांदेड येथील निवासस्थानी शेट्टी चव्हाण यांची भेट घेणार आहे. मात्र, या दोघांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
राजू शेट्टी महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून मविआच्या भाजप विरोधातील वज्रमूठ सभेला नागरिकांचा प्रतिसाद, तसेच बाजार समिती निवडणुकीत जनतेचा मविआला मिळालेला विजय पाहता राजू शेट्टी पुन्हा महाविकास आघाडीत जाणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेस बरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने शेट्टी यांच्यासह सर्वच नेते नाराज होते.
ही नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनाही पत्राद्वारे आपली नाराजी कळवली. पण सरकारने याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शेट्टी यांनी जाहीर केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.