Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात तरूणाला अटक, गावठी कट्टा, काडतुसे जप्त : विटा पोलिसांची कारवाई

विट्यात तरूणाला अटक, गावठी कट्टा, काडतुसे जप्त :  विटा पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

विटा-मायणी रस्त्यावरील पवई टेक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी कट्टा, 2 काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 




फर्नाडिस उर्फ अनिकेत नामदेव माने (वय 21, रा. शिवाजीनगर, विटा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घातक शस्त्रे बाळगणारे, ती घेऊन फिरणाऱ्या संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विट्याचे निरीक्षक डोके यांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या.  

एक तरुण कंबरेला गावठी कट्टा लावून विटा-मायणी रस्त्यावरील पवई टेक येथे थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने पवई टेक परीसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर गायकवाड, हणमंत लोहार, राजेद्र भिंगारदेवे, अमरसिंह सूर्यवंशी, महेश देशमुख, सागर निकम, अक्षय जगदाळे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, रोहीत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.