Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार गोपीचंद पडळकरांनी ग्रामपंचायत सदस्याच्या लावली श्रीमुखात

आमदार गोपीचंद पडळकरांनी ग्रामपंचायत सदस्याच्या लावली श्रीमुखात



सांगली : खरा पंचनामा

आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रासप यांच्यात चुरस होत आहे. रविवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटाच्या काळेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य मंगेश गस्ते यांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर तणाव निर्माण झाला होता. 

आटपाडी येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर आमदार पडळकर यांनी गस्ते यांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद थांबवला. त्यानंतर वातावरण निवळले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.