कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून
सांगली : खरा पंचनामा
कुपवाड-बामणोली रस्त्यावरील कमानीजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यावर कोयत्यांनी वार करण्यात आले आहेत. शिवाय त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे समजते. पोलीस चार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
अमर ऊर्फ गुट्ट्या राजेंद्र जाधव (वय 28, रा. कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमरवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे 2 गुन्हेही दाखल आहेत. त्याचा त्याच्या नातेवाईक तसेच काही मित्रांशी जमिनीवरून वाद सुरू होता, अशी चर्चा आहे.
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो बामणोली कमानीजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित तेथे आले. त्यांच्यात जमिनीबाबतचा वाद झाला. नंतर संशयितांनी त्याच्यावर कोयत्यांनी वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. त्यांनी हल्ल्यात वापरलेले कोयते घटनास्थळीच फेकून दिल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस तसेच एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून एलसीबीचे पथक त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.