Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार बारामतीत : चर्चाना उधाण

नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार बारामतीत : चर्चाना उधाण



बारामती : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवारांनी अचानक हा निर्णय का घेतला? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना शरद पवारांचा फोन आला, त्यानंतर अजित पवार सगळे कार्यक्रम रद्द करून बारामतीमध्ये आले आहेत, असे समजते.

आज शुक्रवारी दुपारीच अजित पवारांनी त्यांचा कॉनवॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीने रवाना झाले आहेत. अजित पवार मांजरीमधील कार्यक्रमाला जात होते, पण तिकडे जात असतानाच त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांनी अचानक त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

महाविकासआघाडीकडून मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण अजित पवारांनी याबाबत वेगळी भूमिका घेतली. 2014 साली देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदींना डिग्री पाहून निवडून दिलं नाही, असं विधान त्यांनी केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.