Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अदानींनी घेतली शरद पवारांची भेट : राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ

अदानींनी घेतली शरद पवारांची भेट : राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ 



मुंबई : खरा पंचनामा 

उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी गौतम अदानी सिल्व्हर ओकवर आले होते. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. 

या भेटीवेळी राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. फक्त या दोघांमध्येच ही चर्चा झाली. चर्चा नेमकी कशावर झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, काँग्रेसकडून गौतम अदानी यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली असावी असं सांगितलं जात आहे. ही भेट नियोजित होती, असंही सांगितलं जात आहे. 

हिंडनबर्ग प्रकरणी काँग्रेसने गौतम अदानी यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी काँग्रेसने संसदेतही आवाज उठवला होता. संसदेच्या बाहेरही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली आंदोलन केलं होतं. तसेच गौतम अदानी यांच्या प्रकरणाची संसदेच्या जेपीसीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधक अदानी प्रकरणी आक्रमक असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी यांची पाठराखण केली होती. 

अदानी प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची गरज नाही. त्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीच योग्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. जेपीसी स्थापन केली तर त्यात विरोधी पक्षांचं संख्याबळ कमी राहील. सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ सर्वाधिक राहील. त्यामुळे जेपीसी समितीचा अहवाल आला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सत्ताधारी कुणाच्या बाजूने राहतील हे उघड आहे, असं पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानानंतरही काँग्रेसने जेपीसीची मागणी लावून धरली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अदानी यांनी पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.