तासगाव बाजार समितीत आरआर आबा गटाचेच वर्चस्व!
सांगली : खरा पंचनामा
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे खासदार संजय पाटील आणि काँग्रेसच्या पॅनेलचा पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. रविवारी तासगाव व आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान झाले. तासगाव बाजार समितीत पुन्हा आरआर आबा गटाचे वर्चस्व सिध्द झाले.
खा. संजय पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरशीने ९७ टक्के मतदान झाले, तर आटपाडीमध्ये ९७.११ टक्के मतदान झाले. तासगावमध्ये भाजपाने काँग्रेससोबत केलेल्या पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली.
तासगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता कायम राखली असली तरी, खा. पाटील यांच्या पॅनेलने चार जागा जिंकून बाजार समितीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील हेही विरोधी पॅनेलमधून विजयी झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.