Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील जनता मविआच्या पाठीशी : बाजार समित्या निकालावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

राज्यातील जनता मविआच्या पाठीशी : बाजार समित्या निकालावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया



सांगली : खरा पंचनामा

राज्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे. पदवीधरांपाठोपाठ ग्रामीण भागातील जनताही मविआच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

बाजार समित्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या आठ- दहा महिन्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिवाय बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न देखील शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले आहे.

१४८ बाजार समित्यांपैकी ७५ पेक्षा जास्त बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने हे घवघवीत यश महाविकास आघाडीच्या मागे उभे केले आहे असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठया क्षमतेची आहे हे आमच्या विरोधकांना कळले असावे असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.