कुनिकोनूरमध्ये पत्नी, मुलीचा गळा आवळून खून : चारित्र्याच्या संशयावरून कृत्य : पती ताब्यात
जत : खरा पंचनामा
जत तालुक्यातील कुनिकोनूरमध्ये पतीने पत्नी आणि मुलीचा गळा आवळून खून केला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्तीवर रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय ३२), मोहिनी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृतांची नावे आहेत. संशयित बिराप्पा बेळुंखी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बिराप्पा वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारी रात्री उशिरा तो नशेत घरी गेला होता. त्यावेळी त्याच्यात आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यातूनच ही मुलगीही माझी नाही असे म्हणत दोघींना मारहाण केली. नंतर त्यांचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर बिराप्पा स्वतः दोघींच्या खुनाची फिर्याद देण्यासाठी गेला. मात्र पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार अधिक तपास करीत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.