Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार

पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार



पुणे : खरा पंचनामा

संपूर्ण देशासह महाराष्ट्रात अलीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. यापुढील काळात पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला.

ज्येष्ठ पत्रकार शामराव दौंडकर यांनी लिहिलेल्या 'धडपड' या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. पवार म्हणाले, अलीकडच्या काळात माध्यमावर हल्ले वाढले आहेत. श्रमिक पत्रकार संघाला वेगळं वलय आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. ही परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही. 

कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ता दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेल मध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. एक नेता सातत्याने एचएमव्ही पत्रकार, चाय बिस्कीट पत्रकार अशी जाहीर वलग्ना करत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातुन वगळले गेले. सुसुंकृत महाराष्ट्रात हा प्रकार शोकांतिका आहे. असे हिणकस प्रकार थाबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची आहे. 

म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.