Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवार यांनीच आता 'एनडीए'मध्ये यावे : रामदास आठवले यांचे आवाहन

शरद पवार यांनीच आता 'एनडीए'मध्ये यावे : रामदास आठवले यांचे आवाहन



सांगली : खरा पंचनामा

अजित पवार भाजपसोबत येऊन मुख्यमंत्री होणार आहेत यात काही तथ्य नाही. अजित पवार यांच्या त्या भूमिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना जायचे असेल ते जाऊदेत असे म्हटले आहे. अजित पवार भाजपसोबत येतील की नाही माहिती नाही मात्र आता शरद पवार यांनीच 'एनडीए'सोबत यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

ना. आठवले शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दुपारी शासकीय आढावा बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ना. आठवले म्हणाले, शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारण शिकलो. केंद्रात यूपीए सरकार असताना मी मंत्री होतो. युपीएसोबत काम केले आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावी काम करत आहेत. सर्वसामान्य लोक त्यांच्या कामावर समाधानी आहेत. म्हणूनच मी 2014 पासून एनडीएसोबत आहे. आणि मंत्रीही आहे. 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे काम चांगले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय युतीचा विजय निश्चित आहे. कर्नाटकातसुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीमुळे भाजपचे सरकार येणार आहे. केंद्रात सुद्धा भाजपचे म्हणजे एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे असे आवाहन ना. आठवले यांनी यावेळी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.