अजित पवारांनी फेसबुक, ट्विटरवरून हटवले राष्ट्रवादीचे चिन्ह!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता अजित पवारांनी फेसबुक, ट्विटर अकाऊंटवरून पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव कायम ठेवलं आहे.
अजित पवार यांनी फेसबुकवरुनही चिन्ह हटवलं आहे. फेसबुकवर फक्त अजित पवार यांचा स्वत:चा फोटो दिसत आहे. त्यांच्या प्रोफाईलचा वॉलपेपरही हटवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह देखील हटवल्याचं दिसत आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.