अजितदादांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा : संजय राऊत
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील असंही राऊत म्हणाले. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात असेही राऊत म्हणाले.
सर्वांत जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी मजबूत आहे. आता सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. सध्या मुख्यमंत्री पदाचा विषय नाही असेही राऊत म्हणाले. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी पाहू असेही संजय राऊत म्हणाले. वज्रमूठ सभा ही तीन पक्ष एकत्र घेऊन करत आहेत. तीन पक्षांचा निर्णय असतो की सभा कोठे घ्यायची? सभेत कोणी बोलायचे? हा तिघांचा निर्णय असतो. त्यामुळं कोणतेही वाद नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.