दुचाकीच्या धडकेत जखमी इचलकरंजीतील न्यायाधीशांचा उपचारावेळी मृत्यू
इचलकरंजी : खरा पंचनामा
येथील अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीशाना दुचाकीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
आर. एन. आंबटकर असे मृत न्यायाधीशांचे नाव आहे. न्या. आंबटकर हे यड्राव येथील पार्वती विद्यामंदिर जवळ राहतात. दि. 21 मार्च रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे यड्राव-जांभळी मार्गावर पायी फिरायला गेले होते. यावेळी एका दुचाकीने (एमच 09 डीडी 9645) त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी इचलकरंजी व तेथून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करून उपचार सुरू केले. मात्र आठ दिवसापूर्वी त्यांचा मेंदू मृत झाला होता. तरीही वैद्यकीय तज्ज्ञांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र याला यश आले नाही. त्यांचे आज सकाळी निधन झाले.
न्या. आंबटकर यांचे पुणे जिल्ह्यातील मंचर हे मूळ गाव आहे. ते जून 2022 मध्ये इचलकरंजी येथे न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.