मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद : उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव
मुंबई : खरा पंचनामा
सत्तेतील सरकार पडण्याच्या, नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चा राज्यात सुरू असताना मध्येच अजित पवार राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मी राष्ट्रवादीतच आहे आणि जीवात जीव असेपर्यंत इथच राहणार असल्याचं सांगितलं.
या सर्व चर्चा सुरू असताना तसेच शरद पवार यांची वेळोवेळीची वक्तव्ये यामुळे महाविकास आघाडी तुटते की काय अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. ही आघाडी तुटू नये यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता महाविकास आघाडी एकत्र राहण्याच्या दृष्टीने ठाकरे गटानेच पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे.
याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.