कोळसा माफिया भाजप नेत्याचा गोळ्या झाडून खून!
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील शक्तीग्रहात कोळसा माफिया, भाजप नेते राजू झा यांचा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. ते दुर्गापूर येथील रहिवासी होते. ते सहकाऱ्यांसोबत कोलकात्याला जात असताना शक्तीगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत वर्धमानचे पोलिस अधीक्षक कमनासिस सेन यांनी सांगितले की, कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण प्रवास करत होते. हत्येचं कारण अजून समजू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे. राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजू झा एसयूव्ही गाडीमध्ये दुकानाबाहेर थांबले होते तेव्हा एका कारमध्ये दोन व्यक्ती आले. एकाने रॉडने कारची काच फोडली, तर दुसऱ्याने गोळीबार सुरू केला. यावेळी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. झा यांच्यासोबत असलेले इतर लोकही जखमी झाले.
घटनेनंतर हल्ले8 पळून गेले. डाव्या आघाडीच्या राजवटीत झा यांच्यावर सिलपंचालमध्ये अवैध कोळसा व्यवसाय चालवल्याचा आरोप होता. तृणमूल सरकारने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.