आता कोल्हापुरात रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूरमध्ये दि. २५ ते २७ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत नुकत्याच घेण्यात आल्या. आता महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित केल्या आहेत. याबाबत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार आहेत.
दीपाली सय्यद म्हणाल्या, स्पर्धेच्या निवड चाचणीबाबत सर्व जिल्हा संघांना कळविण्यात आले आहे. एकूण १० वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र केसरी होणाऱ्या महिला कुस्तीपटूस दुचाकी गाडी बक्षीस देण्यात येणार आहे.
योगेश दोडके म्हणाले, पुण्यात झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना भरघोस बक्षिसे देण्यात आली होती. याच हेतूने महिला कुस्तीगिरांनासुद्धा या स्पर्धेत भरघोस बक्षीस दिली जाणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.