Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर बाजार समितीत बंटी, मुश्रीफ, पीएन, नरकेच ठरले श्रेष्ठ!

कोल्हापूर बाजार समितीत बंटी, मुश्रीफ, पीएन, नरकेच ठरले श्रेष्ठ!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील हेच श्रेष्ठ ठरल्याचे स्पष्ट झाले. या नेत्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली आहे.

विरोधी पॅनेलचे नेते भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलचा पुरता धुव्वा उडाला. हमाल तोलाईदार गटात अपक्ष बाबूराव खोत यांनी तर व्यापारी गटात परिवर्तन आघाडीचे नंदकुमार वळंजू यांनी बाजी मारली.

व्यापारी गटात अटीतटीची लढत झाली असली तरी विकास संस्था व ग्रामपंचायत गटातील सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. दरम्यान राजाराम कारखान्यातील पराभवानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांनी बाजार समितीत महाविकास आघाडीची नव्याने मूठ बांधत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने बाजार समितीत सत्ता राखली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.