बुधगावच्या तरूणाला अटक, दोन पिस्तूल, काडतुसे, तलवार, चाकू जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बुधगाव (ता. मिरज) येथे घातक हत्यारे, शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, ५ काडतुसे, १ तलवार, चाकू, एक कार असा पावणेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
सचिन आनंदा निकम (वय ३१, रा. नम्रता कॉलनी, बुधगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला सोमवारपयर्त पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घातक शस्त्रे बाळगणारे, ती घेऊन फिरणाऱ्या संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी एक खास पथक तयार केले होते.
संदीप निकम त्याच्या कारमध्ये (एमएच १० सीए ५७८६) घातक शस्त्रे घेऊन फिरत असून तो दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. तो शस्त्रे असलेली कार घेऊन बुधगावच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने थरारक पाठलाग करत त्याला थांबवले. त्याच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये धारदार चाकू सापडला तसेच त्याच्या खिशात काडतूस सापडले. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन देशी बनावटीची पिस्तूल, चार काडतुसे, तलवार अशी शस्त्रे असल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील सर्व शस्त्रे जप्त केली आहेत. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सांगली ग्रामीणचे उपनिरीक्षक किरण मगदूम, मेघराज रूपनर, चेतन महाजन, सचिन धोत्रे, संदीप नलवडे, प्रशांत माळी, स्नेहल शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.