Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बामणोलीत बसवेश्वर जयंती, शिवजयंती उत्साहात साजरी

बामणोलीत बसवेश्वर जयंती, शिवजयंती उत्साहात साजरी



कुपवाड : खरा पंचनामा

बामणोली येथे बसवेश्वर जयंती व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, वामनुरीचे सरपंच सौ. गीता चिंचकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अविनाश पाटील म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी दिलेली शिकवण आज समाजाला गरजेची आहे. अंधश्रद्धा, समानता, बंधुता याबाबत दिलेली शिकवण अंगिकारणे खरेच गरजेचे आहे. अंधश्रद्धेचे पूर्ण उच्चाटन होणे गरजेचे आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर दिलेली समानतेची शिकवण आज प्रेरणादायी ठरत आहे. समाज सुसंस्कृत बनला पाहिजे. समाज संस्कृत बनला तर वाढती गुन्हेगारी देखील कमी होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी लिंगायत समाजाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दीपक माळी, अमोल कुंभार, हनुमंत विभुते, अनिल महमाने, अमोल दोडवाडे, देवानंद वसगडेकर, विवेक नंदगावकर, सुरज माळी, महादेव  पारगावे, अनिल राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.