Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक : सांगली एलसीबीची कारवाई

आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगलीसह, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात दुचाकी चोरणार्‍या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या अडीच लाख रुपये किंमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

करण मोहन चव्हाण (वय 26, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ,जि. सांगली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. जिल्हयातील दुचाकी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी एक विशेष पथक तयार केले होते.

 पथक तपास करत असताना संशयित करण चव्हाण हा चोरी केलेली दुचाकी विक्रीसाठी धामणी चौक, सांगली येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सापळा लावून करणला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यावर विलींग्डन कॉलेजचे पाठीमागील कॉलनीमधुन चोरी केल्याचे सांगितले. त्याचबरोबर ठाणे शहर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर शहर व सांगली येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नागज येथील पत्र्याचे शेडमध्ये लपवून ठेवलेल्या आणखी सात दुचाकी जप्त केल्या. मोटार सायकल मिळून आल्या. सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून त्याची एकुण किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. त्याला विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे सुनिल चौधरी, संकेत कानडे, गौतम कांबळे, संदीप पाटील, आमसिध्द खोत, विक्रम खोत, आर्यन देशिंगकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.