Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून परताव्याच्या आमिषाने सव्वा कोटींना गंडा घालणाऱ्यास अटक सांगली आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून परताव्याच्या आमिषाने सव्वा कोटींना गंडा घालणाऱ्यास अटक
सांगली आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई




सांगली : खरा पंचनामा

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने व्हीएचएस ट्रेडर्स आणि एलएलपी कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची सव्वाकोटींची फसवणूक करणाऱ्या मुख्य संशयितास बिबवेवाडी (पुणे) येथून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 

संतोष धोंडीराम ढेमरे (वय ३९, रा. आटपाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष ढेमरेसह संदीप धोंडीराम ढेमरे, विनोद दादासो कदम, हारूण इस्माईल तांबोळी (सर्व रा. आटपाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दि. २८ फेब्रुवारी रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार संतोष ढेमरे पसार झाला होता. 

पोलिस यातील संतोष ढेमरे याचा युद्धपातळीवर शोध घेत होते. तो पुण्यातील बिबवेवाडी येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाल्यानंतर पथकाने तेथून त्याला अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, विनोद कदम, दीपक रणखांबे, कुलदीप कांबळे, दीपाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.