नारायण राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा!
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबईतील मुलुंडच्या न्यायालयात राऊत यांनी हा दावा दाखल केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यासंदर्भात एक विधान केलं होतं. राणे म्हणाले होते की, 'राज्यसभेवर निवडून आणण्यासाठी संजय राऊतांसाठी मी पैसे खर्च केले होते. त्यांचं मतदार यादीतसुद्धा नाव नव्हतं'.
या विधानानंतर संजय राऊत यांनी नारायण राणेंना रितसर नोटीस पाठवली होती. या नोटीस मध्ये, 'विधानाविषयीची माहिती पुराव्यासहित सादर करा', अशी मागणी करण्यात आली होती. मात्र नारायण राणेंकडून त्या नोटीसीला उत्तर मिळाले नाही. यामुळे आता मुलंडच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.