नागपूरच्या आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन
नागपूर : खरा पंचनामा
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे. काँग्रेसने नागपुरातील एका बड्या नेत्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस हायकमांडने या नेत्याला थेट पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस पक्षाने याआधी आमदार सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांवर निलंबनाची कारवाई केलेली. त्यानंतर आता आणखी बड्या नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षाच्या हायकमांडकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने आशिष देशमुख यांना थेट पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. आशिष देशमुख यांनी नुकतंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केलेली. देशमुखांनी टीका केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आशिष देशमुख हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर ते हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.