जतमधील त्या तरुणाचा खून नाहीच : अति मद्यपान केल्याने मृत्यू, पोलिसांचे स्पष्टीकरण
सांगली : खरा पंचनामा
जत-अथणी रस्त्यावरील यल्लमा देवी मंदिराजवळ असलेल्या एका विहरीजवळ तरूणाचा मृतदेह रविवारी पहाटे आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र त्याचा मृत्यू अति मद्यपान केल्याने झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन ऊर्फ शशिकांत बिरा मदने (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. सचिन यल्लमा मंदिराजवळील मदने वस्ती येथे रहात होता. तो चालक म्हणून काम करत होता. काल रात्री तो घरातून काम असल्याचे सांगून निघून गेला होता. रात्रभर तो घरी परतला नव्हता. रविवारी पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना यल्लमा मंदिर परिसरात असलेल्या विहिरीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती ग्रामस्थांनी तातडीने जत पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीत त्याचा मृत्यू अति मद्यपान केल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.