आगामी सणांसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या शुभेच्छा
सांगली : खरा पंचनामा
मिरजेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी बुधवारी सांगलीत आले होते. त्यांनी मिरजेतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विविध धार्मिक, राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी श्री. फुलारी यांनी आगामी रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती, शिवजयंती, अक्षयतृतीया या सणांच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत त्यांनी खरा पंचनामाशी बोलताना याची माहिती दिली.
श्री. फुलारी यांनी यावेळी कोणत्याही अफवांना बळी न पडता सर्व सण उत्साहात साजरे करावेत अशा सूचनाही सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. मिरज आणि सांगलीत घडलेल्या घटना काही समाजकंटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा सांगली पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त केला आहे. अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील नागरिकांनी उत्साहात सण साजरे करावेत असे आवाहनही श्री. फुलारी यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.