भरधाव कंटेनरच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेला पती ठार, पत्नी गंभीर
जत : खरा पंचनामा
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पती जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जत-विजापूर रस्त्यावर एका हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला. गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान यातील कंटेनर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतळताचे जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सांगितले.
सतीश गेनाप्पा शिंदे (वय 32, रा. सातारा रोड, जत) असे मृताचे नाव आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सतीश शिंदे व त्याची पत्नी हे विजापूर रोड वरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. परत येत असताना या दांपत्याला विजापूरहुन साताऱ्याकडे निघालेल्या भरघाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या दोघांनाही रस्त्यावरून फरपटत पुढे नेले. कंटेनरची जोराची धडक बसल्यामुळे सतीश हा जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचे इस्त्री व ड्रायक्लीनचे दुकान आहे. या घटनेमूळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.