राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यात मानहानीचा दावा
पुणे : खरा पंचनामा
राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे सेशन कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
यापूर्वीच एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांना आपली खासदारकी देखील गमवावी लागली. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केल्यानं राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सेशन कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सावरकरांवरून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.