कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील कर्मचारी बापलेकास अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
मल्टिट्रेड कंपनीच्या माध्यमातून जादा परताव्याचे अमिष दाखवून पैसे गोळा केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी बापू कोळी आणि त्यांचा मुलगा ग्रामसेवक स्वप्निल शिवाजी कोळी या दोघांनाही शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असल्याचे समजते. बापलेकास अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ग्रोबज मल्टिट्रेड कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा देतो म्हणून कोळी पितापुत्रांनी मोठी रक्कम अनेकांकडून गोळा केली आहे. हे प्रकरण गेल्यावर्षीपासून सुरू असून या तक्रारी सुरू होवून त्याचा पाठपुरावा सुरू झाल्यानंतर कोळी काही दिवस रजा टाकून बेपत्ताही झाले होते.
याबाबत गुंतवणुकदारांनी पोलिस आणि आयकर विभागासह अन्य शासकीय कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता या दोघांनाही सोमवारी अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कोळी यांच्याकडे पैसे गुंतवल्याची चर्चा आहे. कोळी बापलेकाकडे पैसे गुंतवलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.