नायब तहसिलदारांचा संप अखेर स्थगित
मुंबई : खरा पंचनामा
नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेड पे मिळण्यासाठी 3 एप्रिलपासून तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. राज्य शासनाने वेतन श्रेणी वाढ करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज हा संप स्थगित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हा संप यशस्वी करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या या संपामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले होते.
विशेष म्हणजे या संघटनेचे सदस्य असणारे सर्व उपजिल्हाधिकारी यांनी या आंदोलनामध्ये सहभागी घेतला त्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्यामुळे मागणीची तीव्रता वाढली होती. राज्य शासनाने या संदर्भात राज्यभरातील आंदोलनाची दखल घेत वेतनश्रेणी वाढ होण्यास मंजुरी दिली असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे विभागीय सचिव, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.