Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बंगळुरूमध्ये तक्रार दाखल!

गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात बंगळुरूमध्ये तक्रार दाखल!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यास शाह यांच्या दंगलीबाबतच्या विधानाचा दाखला देत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सामान्य माणसाने असे केले असते तर त्याला अटक झाली असती. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील हे केंद्रीय गृहमंत्री सांगू शकत नाहीत. ते गृहमंत्री आहेत, भाजपचे स्टार प्रचारक नाहीत.

अमित शाह म्हणाले होते की, 'काँग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईल. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असंही शाह म्हणाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.