राष्ट्रवादी, तृणमूल कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेसचाही राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द करण्यात आला आहे. मात्र आपचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.