Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून!

सांगलीत लॉजमध्ये कामगाराने घेतले पेटवून!



सांगली : खरा पंचनामा

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लॉजमध्ये तेथीलच एका कामगाराने बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रेयश लॉज येथे ही घटना घडली. यामध्ये त्या कामगाराचा मृत्यू झाला.

विशाल दबडे (वय ३६, रा. बोलवाड ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

मृत विशाल दबडे बोलवाड येथील रहिवाशी होता. गेल्या दहा वर्षांपासून तो श्रेयस लॉज येथे काम करत होता. लॉजमध्येच तो रहात होता. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लॉजमध्ये असणाऱ्या रूममधील बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. पेट्रोलचा मोठा भडका उडाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. 

यावेळी लॉजमधील व्यवस्थापकांनी रूमकडे धाव घेतली. त्यावेळी आगीचे लोट दिसून आले. त्यांनी तातडीने सांगली शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दबडे यांचा मृत्यू झाला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.