Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेल्वेतून पडल्याने महावितरणचा लाईनमन ठार

रेल्वेतून पडल्याने महावितरणचा लाईनमन ठार



मिरज : खरा पंचनामा

कोल्हापूर येथून मिरजेला येणारा महावितरण कंपनीचा लाईनमन रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने ठार झाला. रविवारी ही घटना घडली होती. सोमवारी उपचार सुरू असताना त्या लाईनमनचा मृत्यू झाला.

गजानन शामराव जाधव (वय 46, रा. म्हैसाळ, ता. मिरज) असे मृत लाईनमनचे नाव आहे. जाधव
महावितरण कंपनीच्या विश्रामबाग येथील कार्यालयात काम करत होते.
रविवारी ते कोल्हापूरहुन मिरजेला रेल्वेने येत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते रेल्वेतून खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

त्यानंतर त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतचा पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.